मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवर डोंबिवलीतील कार्यकर्त्याचे थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवर डोंबिवलीतील कार्यकर्त्याचे थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र

गणेश कदम यांची मागणी : मृतांच्या नातेवाईकांना मदत, मुंब्रा वळणावर स्पीड लिमीट कमी करा; दिवा हॉल्ट रद्द करा

 

आबलोली (संदेश कदम)

मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश अरुण कदम यांनी थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. या पत्रात त्यांनी दुर्घटनेच्या कारणांवर प्रकाश टाकत रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्न उपस्थित केला आहे.

कदम यांनी नमूद केलं की, “मुंब्रा स्थानकाजवळील एस-आकाराचा रेल्वे वळण, गर्दीच्या वेळी ट्रेनचा वेग, तसेच दिवा हॉल्टवरील प्रवाशांची चढ-उतर यामुळे दरवाजांजवळ चेंगराचेंगरी निर्माण झाली. ही दुर्घटना अपघात नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे.”

त्यांनी पुढे नमूद केलं की, कसारा येथून आलेली लोकल दिवा हॉल्ट करत असल्याने आणि मुंब्रा स्टेशनवरील अप-डाउन रुळांमध्ये असलेल्या उंच-सखल फरकामुळे ट्रेन एकाच बाजूला झुकते – यामुळेच अनेक प्रवासी डावीकडे-उजवीकडे फेकले गेले आणि जीव गमवावे लागले.

???? कदम यांनी पत्रात मांडलेल्या प्रमुख मागण्या:

मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी

जखमींवर मोफत व योग्य उपचार व्हावेत

मुंब्राच्या वळणावर स्पीड लिमीट कमी करण्याचे आदेश द्यावेत

डोंबिवली व ठाणे स्थानकांदरम्यान गोंधळ टाळण्यासाठी दिवा हॉल्ट रद्द करावा

लांब पल्ल्याच्या लोकल्ससाठी दिवाला पर्यायी लोकल सेवा सुरु करावी

मुंब्रा स्टेशनवरील अप-डाउन रुळ एकाच लेव्हलवर आणावेत

गणेश कदम यांनी हे पत्र स्वतः दुर्घटना स्थळी जाऊन केलेल्या पाहणीच्या आधारे लिहले असून, त्यांनी रेल्वे प्रशासनाकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

???? संपर्क:

गणेश अरुण कदम – सामाजिक कार्यकर्ते, डोंबिवली

मो. ८८७९७७६२८२

 

 

???? हॅशटॅग्स:

 

#मुंब्रादुर्घटना #रेल्वेमंत्री #गणेशकदम #DombivliNews #रेल्वेअपघात #MumbraAccident #LocalTrainSafety #AshwiniVaishnaw

 

 

 

???? फोटो

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...