???? राज्यात “शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६” उत्साहात साजरा होणार!
शिक्षणाचा उत्सव, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन कटिबद्ध
मुंबई : शालेय शिक्षण विभागातर्फे यावर्षीचा “शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, राज्यभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि मा. श्री. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मा. मा. श्री. अजित पवार तसेच सर्व मान्यवर मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी जवळ ल शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
या उपक्रमाअंतर्गत १५ जून २०२५ पासून २३ जून २०२५ पर्यंतच्या कालावधीत सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळांप्रती आकर्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि पालकांचा सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे.
राज्य सरकारचा उद्देश विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणं, राष्ट्रनिष्ठ, आत्मनिर्भर आणि जबाबदार नागरिक घडवणं हा असून, हा उपक्रम त्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी मंत्री, लोकप्रतिनिधी, शाळा निरीक्षक, शिक्षक आणि पालक यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
???? महत्त्वाचे ठळक मुद्दे :
- शाळा प्रवेशोत्सव १५ ते २३ जून २०२५ दरम्यान.
- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष सहभागाची शक्यता.
- सर्व शाळांमध्ये स्वागत सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, संवाद सत्रे.
- विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन कटिबद्ध.
???? फोटो
????️ #हॅशटॅग्स :
#शाळा_प्रवेशोत्सव२०२५ #SchoolEnrollment2025 #MaharashtraEducation #QualityEducation #शिक्षणाचा_उत्सव #शाळा_चालू #मुख्यमंत्री_शाळ