????️ तळवली हायस्कूलमधून ८ संगणक संच चोरीला!
???? सीसीटीव्हीतही चोरट्यांचा थांगपत्ता नाही; पोलिसांसमोर मोठे आव्हान
तळवली | मंगेश जाधव
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली येथे संगणक संच चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी ८ जुने संगणक संच, ८ मॉनिटर, ८ सीपीयू, ६ यूपीएस बॅटऱ्या व स्टील साहित्य चोरून नेले असून ही चोरी ७ व ८ जून दरम्यान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी गुहागर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी शाळेत भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे शाळेत ४ सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरट्यांचा कोणताही थांगपत्ता लागू शकलेला नाही. त्यामुळे चोरट्यांना परिसराची पूर्ण माहिती होती, ते स्थानिक किंवा जवळचेच असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
हे सर्व साहित्य शाळेतील एका अडगळीच्या खोलीत होते, त्यामुळे कोणी बाहेरून आल्यास त्याची कल्पना येणे कठीण होते. चोरी घडून तीन दिवस उलटूनही अद्याप चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही, यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
“सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर सापडले नाहीत, त्यामुळे प्रकरण गंभीर आहे. तपास वेगाने सुरु आहे.”
— पोलीस निरीक्षक सचिन सावंत
—
????️ #तळवली #गुहागर #संगणकचोरी #शाळा_चोरी #रत्नागिरी_बातमी #SchoolTheft #CCTVFail #KonkanNews
—
???? फोटो