जैतापूरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहातi स्वागत!
✍️राजू सागवेकर – राजापूर
राजापूर तालुक्यातील जैतापूर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
शाळेच्या गोखले सभागृहात पार पडलेल्या या स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक श्री. सुरेश पोवार, विश्वस्त श्री. दिवाकर आडविरकर, मुख्याध्यापिका सौ. राजश्री नारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
???? विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले, तर शासनाच्या वतीने मिळालेली पाठ्यपुस्तके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.
मुख्याध्यापिका सौ. नारे मॅडम यांनी शाळेची शिस्त, वेळेचे महत्त्व आणि अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ शिक्षक विजय कुणकवळेकर सर यांनी सर्वांचे आभार मानले.
???? संस्थेचे विश्वस्त श्री. दिवाकर आडविरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या वतीने सहकार्याचे आश्वासन दिले.
???? विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांची उपस्थिती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे स्वागत सोहळा संस्मरणीय ठरला!















