श्री. महाकाली इंग्लिश स्कुल नवेदर, आडिवरे हायस्कुल मध्ये नवागतांचे औक्षण, पुष्पवष्टी करून स्वागत
राजापूर – संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध नामांकित विद्यालय व महाविद्यालय श्री.महाकाली इंग्लिश स्कुल नवेदर, आडिवरे या हायस्कुल मध्ये 16 जून अर्थातच शाळेचा 1ला दिवस
नवागतांचे औक्षण,पुष्प वृष्टी करून ढोल ताशांच्या गजरात सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर जोशी, जेष्ठ शिक्षक नानगुरे सर तसेच शिक्षक वृंद,माता पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
गजानन सभागृह येथे सरस्वती मातेचे पूजन करून
मा.जस्टीस भालचंद्र नारायण गोखले व सौ. इंदिराबाई भालचंद्र गोखले ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने
शालेय विद्यार्थ्यांकरीता मोफत वह्या वाटप, तसेच महाराष्ट्र राज्य शासनामार्फत विद्यार्थ्यांकरीता मोफत पाठ्यपुस्तक वितरण सोहळा देखील पार पडला. याप्रसंगी सौ.नाईक मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच ग्रंथपाल सौ. कुलकर्णी मॅडम व उपस्थित पालक व शिक्षक वृंद यांच्या हस्ते वह्या तसेच पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यालयात उत्साचे वातावरण होते.