साटवली शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; श्री. गणेश भक्त मुकेश चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
५० स्कूल बॅगसह वह्या, पाण्याच्या बाटल्या, कंपास पेटी यांचे वाटप; “शिक्षण ही मजबूत शिडी” असा प्रेरणादायी संदेश
जितेंद्र चव्हाण (लांजा प्रतिनिधी)
तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साटवली येथे श्री. गणेश भक्त मुकेश चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. “शिक्षण ही एक मजबूत शिडी, जेणेकरून पुढे जाईल पिढी” हा संदेश देत शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप दिवाळे गुरुजी यांनी संस्थेकडे शालेय वस्तूंची मागणी केली होती. याला प्रतिसाद देत ट्रस्टच्या वतीने अनेक साहित्यांची भरघोस मदत करण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत १ ते ४ थीसाठी ३२ प्लास्टिक कंपास सेट व पाण्याच्या बाटल्या, ४ ते ७ वी विद्यार्थ्यांसाठी एकूण ९२ सिंगल लाईन वह्या, तसेच ५ चौरस वह्या, ५ चित्रकला संच, ३३ परीक्षा पॅड, २९ भूमिती कंपास पेटी आणि ५० स्कूल बॅग यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये ट्रस्टचे प्रमुख मंगेश लक्ष्मण तरळ, शिवसेना डोंबिवली शाखाप्रमुख उमेश सुर्वे, गांगोवाडी ग्रामविकास मंडळाचे खजिनदार सत्यवान तरळ, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक कवचे, माजी अध्यक्ष शांताराम सुर्वे, प्रमोद सुर्वे, रवींद्र सुर्वे, प्रतीक भोईटे, मेहेर सुर्वे यांचा समावेश होता.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश नारकर यांनी ट्रस्टचे विशेष आभार मानले. समितीचे सदस्य विश्वास संसारे, इरफान हाज्जू, विश्वास शेलार, मापारी मॅडम, फारुख लांबे तसेच साटवलीच्या उपसरपंच लांबे मॅडम व इतर सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. दिवाळे गुरुजी यांनी मन:पूर्वक आभार मानून, “असेच सहकार्य भविष्यातही मिळावे” अशी अपेक्षा व्यक्त केली.
????️ हॅशटॅग्स:
#शालेयसाहित्यवाटप #साटवलीशाळा #गणेशभक्तमुकेशट्रस्ट #लांजाबातमी #शिक्षणासाठीदान #RatnagiriVartahar
???? फोटो