????️ मुख्यमंत्री फडणवीस यांना आषाढी वारीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण
वारकरी शिष्टमंडळाकडून शासनाच्या निर्णयाबद्दल आभार प्रदर्शन
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबईतील शासकीय निवासस्थानी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी भेट देत येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी शासकीय महापूजेचे औपचारिक निमंत्रण दिले.
यावेळी वारकरी शिष्टमंडळाने आषाढी वारीतील दिंड्यांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान आणि टोलमाफीबाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. शासनाच्या या निर्णयामुळे वारी व्यवस्थापन सुलभ होणार असून, लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
???? #आषाढीवारी #देवेंद्रफडणवीस #वारकरीसंप्रदाय #शासकीयमहापूजा #पंढरपूरवारी #विठ्ठलनामाचा गजर
???? फोटो