चिपळूण एसटी स्थानकात भर गर्दीत महिला प्रवाशाची सोनसाखळी चोरीला!
????
गर्दीचा फायदा घेत १ लाखाची साखळी हिसकावली; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू
????
चिपळूण (प्रतिनिधी) – चिपळूणच्या मध्यवर्ती एसटी बसस्थानकात रविवारी सकाळी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. शीतल शांताराम चाळके (वय ६०, रा. लोटेमाळ, चाळकेवाडी, ता. खेड) या आपल्या भाची रूची संतोष शिर्के (वय २०) हिच्यासह दोनवली-गांग्रई एसटी पकडण्यासाठी चिपळूण एसटी स्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १५ इंच लांबीची, २३ ग्रॅम वजनाची व अंदाजे १ लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पलायन केले.
चोरट्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. चोरट्याचा मागोवा घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली असून, लवकरच गुन्हेगाराचा छडा लागेल, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकारामुळे चिपळूणसारख्या वर्दळीच्या ठिकाणी महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
???? हॅशटॅग्स:
#चिपळूण #एसटीबसस्थानक #सोनसाखळीचोरी #महिला_सुरक्षा #रत्नागिरी #पोलीस_तपास #STBusCrime
???? फोटो