वेलदूर नवानगर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं व गणवेश वितरण
गुहागर (सुजित सुर्वे) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी केंद्र अंजनवेलच्या केंद्रप्रमुख माननीय सौ आरोही शिगवण, वेलदूर ग्रामपंचायतचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ शंकर कोळथरकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहिलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिल्पाताई कोळथरकर, मुख्याध्यापक मनोज पाटील,शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी सुरक्षा ताई रोहिलकर, अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोळथरकर सामाजिक कार्यकर्ते महेश जांभरकर श्रीराम महिला मंडळाच्या पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रियाताई रोहिलकर सदस्या अंकिता कोथळकर, अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे,सुषमा गायकवाड,अफसाना मुल्ला,सर्व शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ सदस्य, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुद्दामवार व आभार प्रदर्शन धन्वंतरी मोरे यांनी केले.