इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ニュー इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

(International Yoga Day celebrated with enthusiasm at New English School and Junior College, Talawali)

तळवली (मंगेश जाधव)
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली, ता. गुहागर जि. रत्नागिरी येथे 21 जून रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी, शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. बागल सर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला, तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जात आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की हा कार्यक्रम मानवी कल्याण आणि चांगल्या आरोग्याला प्रोत्साहन देणारा असून, याविषयी जगभरातील लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. त्यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारची योगासने प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवण्यात आली. यामध्ये पूरक हालचाली म्हणून मानेच्या हालचाली, खांद्याची हालचाल, कमरेच्या हालचाली, पायाच्या हालचाली, तसेच बैठक स्थितीतील आसनेही विद्यार्थ्यांनी केली. कपालभाती, प्राणायाम, ध्यानस्थिती, ताडासन, वृक्षासन, वज्रासन इत्यादी प्रकारची योगासने विद्यार्थ्यांनी केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शाळेचे कला शिक्षक श्री. श्रीनाथ कुळे सर यांनी केलेले सुंदर असे फलक लेखन सर्वांचे आकर्षण ठरले होते.
या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री. बागल सर यांनी केले होते. यामध्ये श्री. साळुंके सर, श्री. देवरुखकर सर, श्री. गवळी सर, श्री. केळस्कर सर, श्री. कुळे सर, श्री. पुनस्कर सर, प्रा. जड्याळ सर, श्री. गुरसळे सर, सौ. नाईक मॅडम, प्रा. आयरे मॅडम, सौ. कांबळे मॅडम, प्रा. सावंत मॅडम, श्री. अक्षय चव्हाण, श्री. प्रणय आरोलकर इत्यादी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

This news report highlights the enthusiastic celebration of International Yoga Day at New English School and Junior College, Talawali. It details the contributions of various staff members, the importance of Yoga Day, and the practical demonstrations of various yoga asanas by the students.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा