जि .प .शाळा पूर्णगड नं.१ शाळेत जागतिक योग दिन उत्साहात संपन्न
रत्नागिरी तालुक्यातील जि .प .शाळा पूर्णगड नं.१ ता .जि. रत्नागिरी या शाळेत जागतिक योग दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. सुरुवातीला प्रार्थना घेऊन ,प्राणायाम, योगासने यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तदनंतर पूर्णगड आरोग्य उपकेंद्राच्या प्रमुख डॉ. गौरी दामले यांनी योगाचे महत्त्व समजावून सांगितले. योग शरीर मन आणि बुद्धी यासाठी किती आवश्यक आहे याचे मार्गदर्शन ओघवत्या शैलीत केले. शा.व्य. समिती सदस्य व आशा सौ. पावसकर मॅडम यांनी हात कसे धुवावेत व त्याची स्वच्छता कशी करावी याची माहिती व प्रात्यक्षिक सादर केले. मुलांकडूनही कृती करून घेण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक – पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच मार्गदर्शनही केले. या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.