निगुंडळ येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात संपन्न…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निगुंडळ येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात संपन्न

तळवली (मंगेश जाधव वेळबंकर)   

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते – दहिवली येथील चतुर्थ वर्षातील कृषीदूत आणि ग्रामपंचायत निगुंडळ संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२५ – २६ या कार्यक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील निगुंडळ गावामध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला..या निमित्ताने वृक्षदिंडी,वृक्षारोपण,PRA(Participatory Rural Appraisal),निबंध व चित्रकला स्पर्धा व कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन देखील करण्यात आले

.यावेळी शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक उदय महाबळ, सरपंच दिप्ती गिजे,सदस्य मयुरेश भागवत,ग्रामसेवक साक्षी गोरे,माजी शिक्षक संतोष धामणसकर,ग्रामस्थ,विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.या नियोजित कार्यक्रमासाठी विद्यार्थांना शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनीतकुमार पाटील व सर्व प्राध्यापकांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!