स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान – महाराष्ट्र राज्य,शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम 2025

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📚✨ *शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम 2025* ✨📚

*स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान – महाराष्ट्र राज्य*

गुहागर मागील वर्षी यशस्वीपणे पार पडलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे प्रेरित होऊन, यावर्षी गुहागर तालुक्यातील 3 शाळांनी शैक्षणिक साहित्याची मागणी केली होती. प्रतिष्ठानकडे आलेल्या या विनंतीला प्रतिसाद देत, आज दिनांक 30 जून 2025 रोजी खालील शाळांमध्ये मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले:

1️⃣ जिल्हा परिषद शाळा खोडदे – निवाते वाडी

2️⃣ जिल्हा परिषद शाळा पोमेंडी – रांगळेवाडी

3️⃣ जिल्हा परिषद शाळा वरवेली – शाळा क्र.2

🧒 यासोबतच एकल पालक (Single Parent) विद्यार्थ्यांनाही साहित्य वाटप करून त्यांना भावनिक आणि शैक्षणिक आधार देण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदिपजी खेतले (अध्यक्ष), दत्ताराम डिंगणकर (जेष्ठ सल्लागार), दिनेशजी झगडे, मितेशजी घडशी, महेंद्रजी मोरे, हेमंत खेतले, राजू खेतले, रोहित सावंत, प्रेम खेतले, व गणेश जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले.

🙏 प्रतिष्ठानकडून आर्थिक आणि वस्तूरूप सहाय्य करणाऱ्या सर्व सहकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार!

“शिक्षणासाठी मदतीचा हात… उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र वाटचाल!”

Sujit Surve
Author: Sujit Surve

Sujit surve * Ratnagiri vartahar* Digital news Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!