विठ्ठलनामाच्या गजरात वाटद-रायवाडी शाळेची भक्तिदिंडी थाटात पार”
रत्नागिरी (प्रतिनिधी) –निलेश रहाटे
जिल्हा परिषद शाळा रायवाडी (वाटद) येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात विठ्ठल-रखुमाई दिंडी सोहळा पार पडला. संपूर्ण परिसर “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
या पावन सोहळ्याचे नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक श्री. सागवेकर सर यांनी केले. त्यांना सहकार्य केले माने सर, किंजळे बाई (अंगणवाडी सेविका), जाधव बाई (मदतनीस) यांनी. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नितीन झगडे, उपाध्यक्ष चेतना जोशी, शिक्षणतज्ज्ञ विनोद वरवठकर, सदस्य दिपक आलीम, माजी उपाध्यक्ष नूतन रहाटे व उदय रहाटे, अनुष्का पिंपुटकर व भालचंद्र पिंपुटकर. दिपक कदम, सोनाक्षी कदम, ईशा मोहिते, बाळकृष्ण पास्टे, मानसी जाधव,
अनिल किंजले. सानिका आलीम. अरुणा आलीम. अवनी वरवठकर, राकेश रहाटे व इतर सदस्य आणि शिक्षक पालक समिती व मातापालक समिती तसेच सर्व पालक,ग्रामस्थ या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याची उत्कृष्ट अशी तयारी यशवंत किंजले माजी शिक्षक हयांनी केली होती तसेच माजी सरपंच अनिकेत सुर्वे, १ नंबर शाळेचे शिक्षक इनामे सर, धोपट वाडी शाळेचे माजी अध्यक्ष श्री. योगेश सागवेकर शिक्षक यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले पायी दिंडी वेशभूषा, हातातील भगवे झेंडे, मुखवटे, नामफलक यांनी परिसरात पंढरपूरचीच अनुभूती निर्माण झाली. पालकांनी देखील या उपक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
शाळेतील उपक्रमशीलता आणि सामाजिक सहभागाचे हे उत्तम उदाहरण ठरले असून, “शाळा आणि समाज” यांचा सुंदर संगम या निमित्ताने घडताना दिसले.