गुरुपौर्णिमा उत्साहात: श्रीराम ग्रामस्थ मंडळाकडून नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

गुरुपौर्णिमा उत्साहात: श्रीराम ग्रामस्थ मंडळाकडून नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

वेलदूर, नवानगर येथील राम मंदिरात प्राचीन गुरु-शिष्य परंपरेचे दर्शन घडले.

गुहागर (सुजित सुर्वे) – वेलदूर नवानगर येथील राम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा झाला. भारतीय प्राचीन संस्कृतीचे संवर्धन आणि नवीन पिढीला मार्गदर्शन मिळावे यासाठी शेकडो वर्षांपासून सुरू असलेली गुरु-शिष्य परंपरा यावेळी अधोरेखित करण्यात आली.

यावर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त, श्रीराम ग्रामस्थ मंडळ आणि श्रीराम महिला मंडळातर्फे परिसरातील सर्व नागरिकांसाठी आणि विशेषतः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, वेलदूर नवानगर येथील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहभोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय महान प्राचीन परंपरेचे दर्शन घडविण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम ग्रामस्थ मंडळ आणि श्रीराम महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी श्रीराम ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख नारायण रोहीलकर, विश्वनाथ रोहिलकर, विकास रोहीलकर, मारुती रोहीलकर, शैलेश रोहीलकर, रमेश रोहिलकर, सुहासिनी रोहीलकर यांच्यासह युवक कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

#Gurupurnima2025 #गुरुपौर्णिमा #Navanagar #Veldoor #Snehabhojan #श्रीरामग्रामस्थमंडळ #IndianCulture #StudentWelfare #CommunityEvent #राममंदिर #गुरुशिष्यपरंपरा #MaharashtraNews #

शिक्षण

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...