बोगस पीकविमाधारक आता सरकारी योजनांपासून वंचित! शासनाने केले अनेक CSC सेवा बंद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 🚨 Breaking News: ‘या’ शेतकऱ्यांवर सरकारचा मोठा निर्णय! 🚨

🚫 बोगस पीकविमाधारक आता सरकारी योजनांपासून वंचित!

#FakeFarmers #NoGovtBenefits

नवी दिल्ली: (सा. रत्नागिरी वार्ताहर)

राज्यात बोगस पीकविमा अर्जांच्या वाढत्या प्रकारांनंतर अखेर सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर खोटे कागदपत्रे सादर करून विम्याचे लाभ घेणाऱ्या तब्बल ५.९ लाख शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे हे शेतकरी पुढील पाच वर्षांसाठी कोणत्याही शासकीय योजनेचे लाभ घेऊ शकणार नाहीत.

या शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकावरही बंदी येणार असून, त्यांना पीएम किसान (PM Kisan), नमो किसान (Namo Kisan), आणि लाडकी बहीण योजनेसह (Ladki Bahin Yojana) इतर अनेक महत्त्वाच्या योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.

२०२४-२५ या कालावधीत पीकविमा योजनेत मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. बनावट ७/१२ उतारे, खोटे भाडेकरार आणि बनावट पीकनोटी वापरून हजारो अर्ज कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्रांमधून भरले गेले होते. यामुळे विमा कंपन्यांना आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला.

या पार्श्वभूमीवर, सरकारने आता कारवाईचा कठोर निर्णय घेत बोगस अर्ज करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची तरतूद केली आहे. नवीन शासन निर्णयानुसार, तहसीलदारांना बोगस अर्ज करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जर एखाद्या अर्जदाराने स्वतःच्या मालकीची जमीन नसताना दुसऱ्याच्या नावावर पीकविमा घेतला असेल किंवा कोणताही अधिकृत भाडेकरार नसताना केवळ खोट्या कागदपत्रांवर विमा घेतल्याचे सिद्ध झाल्यास, तो अर्ज नियमबाह्य मानला जाईल आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या प्रकरणात अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्रांचाही सहभाग समोर आला आहे. मागील वर्षातच १७० केंद्रांचे लॉगिन आयडी बंद करण्यात आले असून, ६३ केंद्रांवर एफआयआर (FIR) दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, यात बीड जिल्ह्यातील केंद्रांची संख्या सर्वाधिक आहे. चौकशीत काही ऑपरेटर महाराष्ट्राबाहेरचे असल्याचेही आढळ

ले आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत आठवडे बाजारही बंद; वाहतुकीस...
Read More
कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता; डिझेलवरील करकपातीसाठी हालचाली...
Read More
इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आणि जि. प.सदस्य विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ०६ जून...
Read More
गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश! 🌍 परदेश दौऱ्यावरून परतताच पीएम मोदी ॲक्शन...
Read More
देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!