रत्नागिरी : नरबे फाटा येथे ट्रक-टेम्पो भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🛑 रत्नागिरी : नरबे फाटा येथे ट्रक-टेम्पो भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मासळी घेऊन मिरकरवाडा जेटीकडे निघालेल्या टेम्पोला समोरून ट्रकची धडक; मृत मुज्झफिर जांभारकर याच्या निधनाने पडवे गावात शोककळा

Ratnagiri Maharashtra

रत्नागिरी | नरबे फाटा परिसरात मंगळवारी (दि. १५ जुलै) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी मुझ्जफिर अमजद जांभारकर (वय २५, रा. पडवे, ता. गुहागर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जखमींमध्ये फिरदोस न्यामत खले (४०) आणि अमजत आलेमिया जांभारकर (५०) यांचा समावेश असून, त्यांच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिरदोस खले व त्यांचे सहकारी मासळी घेऊन गुहागर-पडवे येथून मिरकरवाडा जेटीकडे टेम्पो (MH-08-W-4703) ने निघाले होते. पहाटे ४.३० च्या सुमारास त्यांनी प्रवास सुरू केला. मात्र, नरबे फाट्याजवळ तरवळ-घवाळीवाडी स्टॉपच्या काही अंतरावर समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (MH-09-GJ-4347) त्यांच्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

जोरदार धडकेने टेम्पोचे नुकसान.

या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून, घटनास्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, ट्रकचालकाविरोधात बेदरकारपणाने वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुझ्जफिर जांभारकर याच्या निधनाने पडवे मुस्लिम मोहल्यावर शोककळा पसरली आहे.

📸 फो🔖 हॅशटॅग्स:

#रत्नागिरीअपघात #नरबेफाटा #ट्रकटेम्पोअपघात #मासळीवाहतूक #गुहागरपडवे #RatnagiriNews #AccidentNews #BreakingMarathi #RatnagiriUpdates #मृत्यू #वाहनधडक

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १६व्या सामन्यात राजस्थान...
Read More
सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

🔴  मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 2026’ 🔵 सामाजिक...
Read More
मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर - वेलदूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ,विठ्ठलवाडी ग्रामस्थ...
Read More
नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १५व्या सामन्यात लखनौ सुपर...
Read More
अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

  *शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात* *रत्नागिरी:- निलेश रहाटे जयगड सडेवाडी येथील अल्पभूधारक...
Read More
शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव पणजी (गोवा) (गुरुदत्त वाकदेकर): देशभरातील...
Read More
गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १४व्या सामन्यात...
Read More
बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा   रत्नागिरी: आपल्या देशभरात दिनांक ५ एप्रिल’ हा दिवस...
Read More
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६ ७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६ ७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): छत्रपती शिवाजी...
Read More
शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६  ७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "मराठी...
Read More
मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६