पाटपन्हाळे विद्यालयात उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी; गुरूंचे महत्त्व अधोरेखित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 पाटपन्हाळे विद्यालयात उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी; गुरूंचे महत्त्व अधोरेखित

स्टेट बँकेचे नयनेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे विद्यालयात नुकताच गुरुपौर्णिमा आणि व्यासपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्याध्यापिका सौ. एस.एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शृंगारतळी शाखा व्यवस्थापक श्री. नयनेश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय. भिडे, प्रसिद्धी विभाग प्रमुख एस.एम. आंबेकर, विज्ञान शिक्षक के.डी. शिवणकर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महर्षी व्यास आणि सरस्वतीदेवी यांच्या प्रतिमांना कार्यक्रमाध्यक्षा सौ. एस.एस. चव्हाण आणि श्री. नयनेश शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरी घाणेकर हिने केले, तर आठवीतील विद्यार्थिनी कस्तुरी वझे हिने प्रास्ताविक सादर केले. प्रमुख पाहुणे नयनेश शिंदे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पूर्वा जाधव, आदित्य भिंगारे, अभिज्ञा पवार (इयत्ता पाचवी), प्रीती राठोड (इयत्ता सहावी), सावनी दीक्षित, मधुरा शेलार, श्रीराम भिडे, ऋतुजा भिडे (इयत्ता सातवी), रिद्धी धामणस्कर, स्वरा बारे, श्रीया धुमक, नवशिन नदाफ, वीणा देसाई, वेदांत धुमक, अथर्व राठोड (इयत्ता आठवी) आणि देवयानी घरट (इयत्ता दहावी) या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय. भिडे यांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्षा तथा मुख्याध्यापिका सौ. एस.एस. चव्हाण यांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा हेतू आणि गुरूंचे जीवनातील महत्त्व यांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांचे तसेच मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आठवीतील शार्दुल ओक याने मान्यवर, शिक्षकवृंद आणि उपस्थित विद्यार्थी यांचे सहकार्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

#मराठीबातम्या #गुरुपौर्णिमा #पाटपन्हाळेविद्यालय #न्यूइंग्लिशस्कूल #शिक्षण #सांस्कृतिककार्यक्रम #विद्यार्थी #गुरुमहत्व #गुहागर #र

त्नागिरी

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत आठवडे बाजारही बंद; वाहतुकीस...
Read More
कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता; डिझेलवरील करकपातीसाठी हालचाली...
Read More
इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आणि जि. प.सदस्य विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ०६ जून...
Read More
गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश! 🌍 परदेश दौऱ्यावरून परतताच पीएम मोदी ॲक्शन...
Read More
देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!