जि. प. सीईओ वैदही रानडे यांचे आबलोलीत जंगी स्वागत
आबलोली, (संदेश कदम): गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीमती वैदही रानडे यांचे आबलोली येथे जंगी स्वागत करण्यात आले. गुहागर दौऱ्यावर असताना श्रीमती रानडे यांनी आबलोली येथील गुरुप्रसाद आचार्य यांच्या निवासस्थानी न्याहारीसाठी थांबल्या असता, सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांनी त्यांचे आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांचे आदरातिथ्य केले.
यावेळी सीईओ वैदही रानडे यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता श्रीमती मयुरी पाटील, गुहागरचे गटविकास अधिकारी श्री. शेखर भिलारे, सहाय्यक गटविकास अधिकारी भांड, बांधकाम विभागाचे उप अभियंता सळमके, श्री. छत्रे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांनी या सर्वांचेही उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
#वैदहीरानडे #आबलोली #गुहागर #जिल्हापरिषद #ग्रामपंचायत #स्वागत #निमर्मलग्रामपंचा
यत