रत्नागिरीत २१ जुलै रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन!
महिलांच्या तक्रारींचे निवारण; जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ वेळेत आयोजन
रत्नागिरी: महिलांचे प्रश्न आणि तक्रारी सोडवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन या महिन्यात सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी दिली आहे.
या लोकशाही दिनामध्ये अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून आपल्या तक्रारी किंवा समस्यांबाबत निवेदन सादर करू शकतात. महिलांनी सादर केलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने, जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना महिलांच्या वैयक्तिक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातात. हा उपक्रम महिलांना त्यांचे प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडण्याची आणि त्यावर तात्काळ उपाययोजना मिळवण्याची संधी देतो.
#महिलालोकशाहीदिन #रत्नागिरी #महिलाविकास #जिल्हाधिकारीकार्यालय #MaharashtraNews #WomenEmpowerment #Ratanagiri #LocalDemocracyDay #महिलांचेप्र
श्न