लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात यशस्वी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
: मुंबई विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त निसर्गाचे संवर्धन; राष्ट्रीय सेवा योजना व नेचर क्लबचा स्तुत्य उपक्रम
लोकनेते शामरावजी पेेजे महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी – संदीप शेमणकर
श्रमिक किसान सेवा समिती संचालित, लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिवार आंबेरे अंतर्गत, “राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नेचर क्लब” यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून “वृक्षारोपण कार्यक्रम” संपन्न झाला. महाविद्यालयीन परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे, आंबा, काजू, फणस, साग इ. त्याचप्रमाणे औषधी वनस्पती यांची लागवड करून हा उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्या. कल्पना मेस्त्री व नेचर कल्ब विभागप्रमुख प्राध्या. अनुष्का लिंगायत यांनी विशेष मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रमोद वारीक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. हा उपक्रम निसर्गाच्या सानिध्यात अतिशय उत्तमरीत्या संपन्न झाला.
Hashtags
#LokneteShamraoPejeCollege #TreePlantation #Ratnagiri #NSS #NatureClub #EnvironmentalProtection #MumbaiUniversity #वृक्षारोपण #पर्यावरणपूरक #संदीपशेमणकर #MaharashtraEducation #GreenCampus #SaveNature #शिवारआं