🟣 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे मुंबईत एकाच हाँटेलमध्ये एकत्र? चर्चांना उधाण.
मुंबई– राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांची हाँटेलमध्ये भेट झाली असेल तर राजकारणात नवे समीकरण तर उदयास येणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकत्र असल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते अशी माहिती मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विधान भवनातील कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीची का नको याबाबातचं एक पुस्तक देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून दिलं होतं. त्यानंतर फडणवीसांनीदेखील सभागृहात त्या पुस्तकाबाबत माहिती दिली होती. तसेच असं कुणीही कुणाला भेटलं की युती किंवा राजकीय मैत्री होत नाही, असंही फडणवीस यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिल्यानंतर विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट दिली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना तुम्ही ऑफर दिली म्हणून स्वागताला उभे असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये; राजकीय वर्तुळात चर्चांना उधा
: मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमधील उपस्थितीने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या; नव्या समीकरणांची शक्यता?
Hashtags (
#DevendraFadnavis #AdityaThackeray #MaharashtraPolitics #MumbaiNews #PoliticalBuzz #UddhavThackeray #ThackerayVsFadnavis #PoliticalMeeting #सॉफ्टिलहॉटेल #राजकीयघडामोडी #मुख्यमंत्री #आदित्यठाकरे #मुंबईराजकारण #ब्रेकिंगन्यू
ज