किल्ले धर्मवीरगडावरील छत्रपती शंभुराजांच्या शौर्यस्थळावर महाराणी येसुबाईंची जयंती उत्साहात साजरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

किल्ले धर्मवीरगडावरील छत्रपती शंभुराजांच्या शौर्यस्थळावर महाराणी येसुबाईंची जयंती उत्साहात साजरी

 

श्रीगोंदा (प्रतिनिधि) : मौजे पेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर येथील किल्ले धर्मवीरगडावरील छत्रपती शंभुराजांच्या शौर्यस्थळावर स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याच्या युवराज्ञी, छत्रपतींच्या शिवस्नुषा, छत्रपती शंभुराजांच्या सखी राज्ञी जयति वीरपत्नी महाराणी येसूबाई सरकार, म्हणजेच छत्रपती थोरल्या शाहूराजांच्या राजमाता राजाऊ साहेबांची प्रथम साजरी होणारी ३६७ वी जयंती रविवार दि.२७ जुलै रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंती प्रसंगी २७ जुलै रोजी शंभुराजांच्या शौर्यस्थळावर स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते विधिवत पुजन करण्यात आले. दरम्यान गडदुर्ग संवर्धक, व्याख्याते वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी येसुबाईंच्या पराक्रमी व त्यागमयी इतिहासावर प्रकाश टाकला. तसेच येसुबाईंच्या नावाचा जयघोष करत त्रिवार मानाचा मुजरा करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी बोलताना शंभुराजांचे शौर्यस्थळ व किल्ले धर्मवीरगड विकासासाठी प्रशासन व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू दखल न घेतलयय वेळप्रसंगी किल्ल्यावर उपोषण, आंदोलन करू असे सांगितले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिव- शंभुभक्त व सामाजिक कार्यकर्ते मा. संतोष इथापे, महाराणी येसुबाई तथा स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गाणोजीराजे पिलाजीराव शिर्के यांचे वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक पत्रकार चंदन घोडके, कुस्तीप्रेमी वस्ताद शांताराम रामचंद्र पोटे, सामाजिक नेते गणेश मैंद , भागवत कळसकर, गडरक्षक मच्छिंद्र पंडित, पेडगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी, ग्रा. पं. सदस्य, शिक्षक, शालेय विद्यार्थी, शिव-शंभुभक्तांसह ग्रामस्थ उपस्थित होते. जयंती साजरी करण्यासाठी किल्ले धर्मवीरगड समिती पदाधिकारी व किल्ले उत्सव कमिटीचे सहकार्य लाभले.

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...