जिल्हा फोटो असोसिएशन वतीने सिनेमॅटिक कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी ~जिल्ह्यातील व्यावसायिक फोटोग्राफर अधिक प्रगत व प्रशिक्षित व्हावेत संघटित व्हावे यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन वतीने विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते. जिल्हा असोशियन वतीने गेल्या काही वर्षात 500 कार्यशाळा व दोनशे वेबिनार यशस्वी रित्या संपन्न केले. रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन व चिपळूण तालुका असोसिएशन वतिने आयोजित सोनी इंडिया तसेच सन आर्ट ग्रुप सारडा सांगली यांच्या सौजन्याने गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी चिपळूण येथील रीम्स हॉटेल येथे तर एक ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा व रत्नागिरी तालुका यांच्या सहकार्याने हेच वर्कशॉप रत्नागिरी येथील हॉटेल सी फॅन येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. या वर्कशॉप मध्ये प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अरुण कुमार व सुनील गवळी सर सोनी कंपनी वतीने पाबरेकर, सारडा ग्रुप वतीने शरद सारडा यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात मांडवी बीचवर मॉडेलसह प्रॅक्टिकल वर्कशॉपही घेण्यात आले.
केलेल्या सिनेमॅटिक शूट चे एडिटिंग कसे करावे याबद्दल हे प्रॅक्टिकल वर्कशॉप मध्ये ट्रेनिंग देण्यात आले
या वर्कशॉपला रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक फोटोग्राफर बंधूनी लाभ घेतला.
रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन वतीने सोनी कंपनी ,सारडा ग्रुप तसेच आलेल्या सर्व फोटोग्राफर बंधूंचे आभार व्यक्त केले. तसेच भविष्यात होऊ घातलेल्या इतर वर्कशॉप ना ही असेच भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.