कुणबी समाजोन्नती संघ,दापोली आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मुलुंड येथे संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कुणबी समाजोन्नती संघ,दापोली आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मुलुंड येथे संपन्न

मुलुंड – संदीप शेमणकर
कुणबी समाजोन्नती संघ, शाखा तालुका दापोली आणि युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणगौरव आणि शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर मुलुंड वसतिगृह येथे शाखेचे अध्यक्ष विजय नायनाक यांच्या अध्यक्षतेखाली समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन केल्यानंतर कु.नव्या मांडवकर या विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला सुरवात झाली.
यावेळी तालुक्यातील १० वी, १२ वी, पदवीधर तसेच विशेष प्राविण्य असलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, सीए,वकील, इंजिनिअर,क्रीडा आदी क्षेत्रामध्ये पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रो.महेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील असणाऱ्या संधी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पेशाने शिक्षिका असणाऱ्या कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा दिपिका आग्रे यांनी देखील पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. तसेच विलास खांबे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सौ.श्रेयाताई कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संघाचे सहसचिव प्रमोद खेराडे, शाखेचे उपाध्यक्ष सुरेश गावडे,रमेश काटकर,ऍड. जय गौरत,सचिव नरेश घरटकर,सहसचिव निलेश पानकर, सुनिल कानसे, सुनिल धोपट,सचिन चिपटे,खजिनदार अनुज चव्हाण, हिशोब तपासणीस विजय गौरत, कार्यकारणी सदस्य लक्ष्मण हरावडे,चंद्रकांत चोगले,राजेश आईनकर,रविंद्र बैकर, पांडुरंग जांभळे,चेतन नामोळे,दत्ताराम रेमजे, अंकुश शिंदे,युवक मंडळाचे अध्यक्ष संतोष पांढरे,सचिव तेजस पवार,उपाध्यक्ष नरेश गावडे,संकेत पाते,सुरेश वनगुले, सहसचिव सूरज गोरीवले तसेच पांडुरंग लोंढे,राजू भावे,अशोक पानकर,गणेश पवार,नंदकिशोर खापरे, संतोष शिगवण, सुनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...