मोगरे गावचे सुपुत्र श्री.जयवंत अनंत गिरकर यांचा बृहन्मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्ती सोहळा संपन्न 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मोगरे गावचे सुपुत्र श्री.जयवंत अनंत गिरकर यांचा बृहन्मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्ती सोहळा संपन्न 

मुंबई – संदीप शेमणकर

मोगरे गावचे सुपुत्र श्री. जयवंत अनंत गिरकर हे आपले बालपण व शालेय जीवन (इ.1 ली ते 7 वी) मोगरे येथील प्राथमिक मराठी शाळेत पूर्ण करून, पुढील शिक्षणासाठी मुंबईकडे वळले. त्यांनी मुंबईतील लालबाग येथे वास्तव्यास राहत बृहन्मुंबई महानगरपालिकेत गेली ४० वर्षे प्रामाणिक अहोरात्र सेवा केली.

सुतारकाम विभागात, त्यांनी फक्त कौशल्य दाखवले नाही, तर प्रामाणिकपणा, लीडरशिप व संघभावना जपत समाजासाठी एक आदर्श ठरले. कार्यक्षेत्रात ते नेहमी समर्पणभाव, नेत्रुत्व व कामात गुणवत्ता यासाठी ओळखले गेले.

त्यांचा यशस्वी सेवानिवृत्तीचा दिवस ३१ जुलै २०२५ हे केवळ एका नोकरीचे पूर्णविराम नसून, एका यशस्वी प्रवासाचा गौरव होता.

ते सामाजिक कार्यात, सण-उत्सवांत, विशेषतः गावच्या होळी व गणपती उत्सवात आवर्जून सहभागी होणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात मनापासून सामील होणारे व्यक्तिमत्त्व,एकोपा, मदतभावना, दानशूरता आणि माणूस जोडण्याचे गुण त्यांच्यात ठासून भरलेले आहेत. या सोहळ्या साठी प्रमोद, गिरकर, मनोज गिरकर उपस्थित होते.

आज पंचक्रोशीतील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या या सेवेला व कार्याला मानाचा मुजरा करत आहे. ईश्वर त्यांच्या पुढील आयुष्याला उत्तम आरोग्य, आनंद, समृद्धी आणि सामाजिक मार्गदर्शनाची ऊर्जा देवो हीच प्रार्थना!

या यशस्वी सेवानिवृत्ती बद्दल मोगरे गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, व आसपासच्या परिसरातील, विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...