सफर सह्यदुर्गांची आयोजित किल्ले रत्नदुर्ग प्लास्टिक मुक्त गड संवर्धन मोहीम यशस्वी संपन्न
रत्नागिरी – संदीप शेमणकर
रविवार दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी. सफर सह्यदुर्गांची आयोजित किल्ले रत्नदुर्ग प्लास्टिक मुक्त गडसंवर्धन मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मयूर भितळे,शुभम आग्रे,सौरव बळकटे,सुरज
खोचाडे,अक्षय भोसले,
ओंकार सावंतदेसाई,खुशी गोताड,तेजस खापरे,दर्शन शेळके,सेजल मेस्त्री,अक्षय घाग,
नयन कदम,रश्मी जाधव यांनी सहभाग घेत, खूप मेहनत घेतली.
त्यावेळी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र चे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर ,फणसवळे गावचे सरपंच निलेशजी लोंढे हे देखील उपस्थित होते.वरील सर्व तरुण तरुणींनी दिवसभर उन्हातून पावसातून मेहनतीने तसेच काही ठिकाणी असलेला कचरा हा जीवाशी खेळून जमा केला.
आपली रत्नागिरी पर्यटन दृष्ट्या खूप सुंदर आहे ती अस्वच्छ करू नका आणि पूर्ण रत्नागिरी हे माझे घर समजून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना देखील ती अस्वच्छ करायला देऊ नका ,
असे आवाहन (संदेश )देखील
ॲड.महेंद्र मांडवकर आणि वरील सर्व टीमने सर्व रत्नागिरी कराना केले आहे. “आपली रत्नागिरी स्वच्छ रत्नागिरी”