गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांना ‘उत्कृष्ट तहसीलदार’ पुरस्कार
जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान, गुहागर तालुक्यातून शुभेच्छा.
प्रामाणिक जनसेवा आणि आपत्कालीन नियोजनासाठी गौरव, अभिनंदनाचा वर्षाव
आबलोली (संदेश कदम) – गुहागर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार परिक्षित पाटील यांना त्यांच्या प्रामाणिक जनसेवा आणि उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीबद्दल ‘उत्कृष्ट तहसीलदार’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्या शुभहस्ते त्यांना हा बहुमानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपत्कालीन परिस्थितीत गुहागर तालुक्यात उत्कृष्ट नियोजन करून प्रशासनाला गतिमान केल्याबद्दल आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली. या पुरस्कारानंतर गुहागर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आबलोली गावचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रमेय आर्यमाने, तसेच उद्योजक ओंकार बाईत यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तहसीलदार परिक्षित पाटील यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे गुहागर तालुक्याची मान उंचावली असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कार्यासाठी जनतेकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
हॅशटॅग
* #तहसीलदार #Tahsildar
* #गुहागर #Guhagar
* #परिक्षितपाटील #ParikshitPatil
* #उत्कृष्टतहसीलदार #BestTahsildar
* #रत्नागिरी #Ratnagiri
* #पुरस्कार #Award
* #महाराष्ट्र #Maharashtra