राजापूर -(दिनेश कुवेस्कर)……
राजापूर तालुक्यातील जानशी गावाचे सुपुत्र श्री रुपेश र. पंगेरकर यांना नुकतीच पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी मध्ये उपमुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली आहे, श्री.रुपेश पंगेरकर हे शालेय जीवनापासून च हुशार आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते, गावातील अनेक सार्वनिक कार्यक्रमात ही ते मोठ्या आनंदाने सहभागी होत असत, कै.श्री.रमाकांत पंगेरकर आणि श्रीमती रुपाली र. पंगेरकर यांचे ते ज्येष्ठ पुत्र आई वडील दोघेही शिक्षकी पेशात कार्यरत होते त्यांचे लहान भाऊ ही शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
श्री.रुपेश र. पंगेरकर यांची उपमुख्यद्यापक पदी बढती झाल्याने राजापूर तालुक्यातील अनेक मान्यवर आणि मित्रमंडळी,नातेवाईक यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.तर जानशी गावातीलं निवेली सरपंच स्नेहा दिनेश कुवेसकर यांनी ही त्यांचे अभिनंदन केले आहे.