गणेशोत्सवात सतर्क रहा – पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचे आवाहन..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणेशोत्सवात सतर्क रहा – पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचे आवाहन..!

आबलोली (संदेश कदम)….

कोणी अनोळखी व्यक्ती रात्री अपरात्री संशयास्पद फिरत असेल परप्रांतीय व्यक्ती कोणतीही वस्तू विकण्याच्या बहाण्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा व्यक्तींची माहिती कधीही आम्हांला कळवा आंम्ही पोलीस २४ तास आपल्या सेवेशी हजर आहेत कोणताही गुन्हा घडण्या आधी त्याची आंम्हाला माहिती द्या. गर्दीच्या ठिकाणी असली दागिने घालून फीरु नका, बंद घरात मौल्यवान वस्तू ठेऊ नका. पोलीसांना सहकार्य करा तसेच गणेशोत्सवात गर्दीच्या हंगामात वहाने मार्केटमध्ये ऊभी करु नका गर्दी टाळा,नकली दागिने घाला कारण दागिने परत मिळवता येतात पण गेलेला जीव परत मिळवता येत नाही. त्यामुळे आपली आपल्या परिवाराची काळजी घ्या परप्रांतीयांची पोलीस स्टेशनला नोंद करा आणि गणेशोत्सवात सतर्क रहा असे जाहीर आवाहन गुहागर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी केले.
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे सन २०२४ यावर्षीच्या गणेशोत्सवा निमित्ताने वाहतूक व्यवस्थापन, मार्केटमध्ये होणारी गर्दी आणि परप्रांतींय कींवा संशयीत व्यक्तीं पासून महिलांनी – नागरीकांनी घ्यावयाची काळजी आदी. महत्त्वाच्या विषयावर गुहागर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटना आबलोली तसेच वडाप संघटना,ट्रॅव्हल्स संघटना, रिक्षा संघटना यांच्या पदाधिकारी यांचेसह नागरीकांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांचा शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग आपली भूमिका चोख बजावत आहे त्यामुळे नागरीकांनी कोणतेही काम करताना हेतू चांगला ठेवा. कोण चुकीचा वागत असेल तर त्याला समजावून सांगा तुंम्ही कुणावरही हात उचलू नका हॉटसप ग्रुपवर चुकीच्या पोस्ट करु नका. परप्रांतीय कींवा परक्या व्यक्तीपासून सावध रहा. भूल थापांना बळी पडू नका. सायबर फॉर्डचे प्रमाण आता शहरातून खेडेगावाकडे ग्रामीण भागात लागू झालेय त्यामुळे लिंक – ओटीपी आणि चुकिचा ऍप डाऊनलोड करु नका अकाऊंट खाली होईल त्यामुळे छोट्या – छोट्या गोष्टींची काळजी घ्या दिनांक ३ सप्टेंबर २०२४ ते १४ सप्टेंबर २०२४ हे आठ दिवस गर्दीचा हंगाम संभाळा आणि अनुसूचित प्रकार घडू देऊ नका पोलीसांना वेळीच खबर द्या असे जाहीर आवाहन पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी केले. यावेळी आबलोली बीटचे अंमलदार किशोर साळवी, रविंद्र आठवले,प्रशांत पाटील,सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके,उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामसेवक बाबूराव सुर्यवंशी,तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, सचिन बाईत, सचिन कारेकर, यशवंत पागडे, महेंद्र कदम, प्रमोद गोणबरे,सागर रेपाळ,विनोद राजाराम कदम, गोपिनाथ शिर्के, अजित मोहिते, राजेंद्र काताळकर, सुनिल दाते, प्रतिक सुर्वे, सुभाष काजरोळकर, वैभव राऊत, विजय पागडे आदी. उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam