मासू तंटामुक्ती समीती अध्यक्षपदी श्री. विजय भोजने यांची बिनविरोध निवड..!
(सरपंच श्री. प्रकाश भोजने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध निवड)
आबलोली (संदेश कदम) …..
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत मासू या ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समीती अध्यक्षपदी श्री. विजय सिताराम भोजने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. हि बिनविरोध निवड होण्यासाठी सरपंच श्री. प्रकाश भोजने यांच्या आणि ग्रामस्थांच्या मौलिक सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय सिताराम भोजने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला . यावेळी या ग्रामसभेला सरपंच श्री.प्रकाश भोजने,ग्रामसेवक श्री.सुनिल कदम यांचेसह गावातील वाडी प्रमुख, गावकर,ग्रामस्थ महिला – पुरुष बहूसंख्येने उपस्थित होते.श्री. विजय भोजने हे दुस-याच्या सुख – दु:खात मदतीला धावून जातात अशी त्यांची ओळख आहे. गावातील सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन गावाचा एकोपा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. मासू तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. विजय भोजने यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने मासू पंचक्रोशीतून श्री. विजय भोजने यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत