अंधेरी पूर्व येथे विश्वशांती बुध्द विहारात वर्षावासानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न..!
आबलोली (संदेश कदम)
अंधेरी पूर्व येथील सावित्रीबाई फुले नगर, सहार कार्गो रोड, सहार गाव येथील विश्वशांती बुध्दविहारात बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक ६५७ मधील विश्वदिप महिला मंडळ, सावित्रीबाई फुले रहिवाशी सेवा संघ तसेच विश्वशांती तरूण मित्र मंडळ यांच्या विद्यमाने वर्षावासाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या सुरवातीला शाखेतील महिला मंडळ आणि सभासदाच्या हस्ते दिपप्रज्वलन करून बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी वर्षावास मालिकेतील चौथे पुष्प वाहताना पत्रकार मेघना सुर्वे यांनी ‘महिलांनी धम्म समजून घ्यावा’ या विषयावर उपस्थितांना प्रबोधन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद बौध्दाचार्य विश्वास सावंत यांनी स्विकारले होते.तसेच यावेळी शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, चिटणीस रविंद्र पवार, तेजस यादव, उत्तेज जाधव, राजकुमार यादव, नितेश जाधव, दिनेश जाधव, राहुल पवार, अनिल पवार, दिपक जाधव, कुमार जाधव, प्रणिल सावंत तसेच विश्वदिप महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिक्षा पवार, उपाध्यक्षा रुपाली पवार, चिटणीस रमिता यादव, अंतरा यादव, संचिता सावंत, ऋतुजा नंदागवळी, वंदना जाधव, वृषाली यादव, सुलभा गमरे, प्रणिता सावंत, विनिता जाधव, प्रांजली सांवत, पिटी अक्का यांचेसह सभासद आणि शाखेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर कासारे यांनी केले.शेवटी आभारप्रदर्शन आणि अल्पोआहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,

Author: Sandesh Kadam
संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक