बेकायदा वाळू उपसा संदर्भात क्रिकेट पटू प्रवीण आमरे यांना नोटीस….!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बेकायदा वाळू उपसा संदर्भात क्रिकेट पटू प्रवीण आमरे यांना नोटीस....!

समिर शिरवडकर – रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील रिळ ग्रामपंचायत चे हद्दीत भारताचा माजी क्रिकेपटू प्रवीण आमारे यांनी समुद किनारी केले ले अवैध रीता वाळू उत्खनन आणि बांधकाम हे संशयास्पद आणि वादात सापडले आहे.हे बांधकाम अवैध असून बेकायदा, विनापरवाना वाळू उपसा केल्याचा ठपका त्यांचेवर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी रत्नागिरीचे तहसीलदार यांनी आमरे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे , या नोटीसी मार्फत दंड म्हणून १२.६७ लाख रुपये का? आकारण्यात येऊ नयेत अशी विचारणा करण्यात आली आहे.

रीळ येथील या अनधिकृत बांधकाम व वाळू उपसा संदर्भात RTI महासंघाचे राज्य सचिव श्री.समिर शिरवडकर- रत्नागिरी यांनी अर्ज केला होता व कारवाई ची मागणी केली होती त्यानुसार श्री.म्हात्रे तहसीलदार – रत्नागिरी  यांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

या नोटीस लां उत्तर देण्यासाठी त्यांना १५ दिवसाची मुदत दिली आहे.त्यानंतर त्यांचेवर योग्य ती का्यवाही करू असे तहसील कार्यालयाकडून समजते.

एकूणच आमरे हे या बांधकाम प्रकरणाने चांगलेच अडचणीत आले आहेत

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...