गुरू कशी विद्यापीठ पंजाब येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये चिपळूणच्या साहिल काटकर चे उज्वल यश..!
आबलोली (संदेश कदम)………
चिपळूण तालुक्यातील नामांकित शरदचंद्र पवार साहेब कृषी महाविद्यालय,खरवते – दहिवली या महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष कृषी मधील कु.साहिल काटकर याने गुरू कशी विद्यापीठ,भटींडा, पंजाब यांच्या वतीने दि.२९ ते ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान आयोजित ‘कृषी व संबंधित विज्ञानातील वर्तमान नवकल्पना आणि तांत्रिक प्रगती’ या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे
या स्पर्धेच्या संशोधनपत्र सादरीकरण स्पर्धेमध्ये ‘आधुनिक आणि पारंपारिक पीक पद्धतीचे मिश्रण वापरून कलिंगड पिकाची लागवड’ यावर कु. साहिल काटकर याने आपले संशोधन पत्र सादर केले.या स्पर्धेमध्ये त्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.या यशाबद्दल चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार आणि सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम,प्राचार्य डॉ.सुनीतकुमार पाटील यांनी कौतुकपर अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेमध्ये विदेशी आणि देशांतर्गत विद्यार्थी स्पर्धकांचा सहभाग होता.यासाठी प्रा.प्रशांत पवार यांनी विशेष मार्गदर्शन केले.