🌧️💦 कोयनेचे दरवाजे दीड फुटांनी वर; गावांना सतर्कतेचा इशारा!
पाटण परिसरात मुसळधार; धरणातून १२,१०० क्युसेक पाणी सोडले
पाटण (प्रतिनिधी)
कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने रविवारी दुपारी चार वाजता सहा वक्री दरवाजे दीड फुटांनी वर उचलण्यात आले. यामधून १० हजार क्युसेक पाणी तर पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून २,१०० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. अशा प्रकारे एकूण १२,१०० क्युसेक पाणी कोयना नदीकडे वळवण्यात आले आहे.
यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.
सध्या धरणात ९४.०९ टीएमसी पाणीसाठा असून धरण शंभर टक्के क्षमतेने भरण्यासाठी फक्त ११.१६ टीएमसी पाण्याची गरज आहे. गेल्या २४ तासांत (शनिवार संध्याकाळी पाच ते रविवार संध्याकाळी पाच) धरणात ३.०२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
दरम्यान, या मोसमातील पावसाची नोंद पुढीलप्रमाणे झाली आहे :
कोयना – ९२ (३३९३) मिमी
नवजा – १७९ (४०३९) मिमी
महाबळेश्वर – १०० (३९७०) मिमी
🔴 प्रशासनाने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
📸 फोट
—
🏷️ हॅशटॅग्स :
#RatnagiriVartahar #KoynaDam #पाटण #कोयना_धरण #धरणसोड #FloodAlert #महाबळेश्वरपाऊस