जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूण गोंधवली मध्ये स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूण गोंधवली मध्ये स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा.

लांजा,प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूण गोंधवली मध्ये स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत, समुहगीत गायन, प्रभात फेरी, संगीतमय कवायत, तसेच संस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात सादर करण्यात आला.

स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी ग्राम. सदस्या सौ. जयश्री सरवंदे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. चेत्राली चंदूरकर,सौ अपर्णा सरवंदे सौ. अक्षरा पाष्टे, सौ. जयश्री डोंगरकर, तशेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, अंगणवाडी ताई सौ कोळंबेकर, सौ पराडकर मॅडम, वाडीतील ग्रामस्थ श्री जयवंत नेमन, श्री शरद चंदूरकर श्री दिलीप जोंधळे, श्री जगन डोंगरकर, श्रीपत सरवंदे, महेंद्र तरळ, मोहन सरवंदे, तानाजी सरवंदे तशेच जेष्ठ नागरिक अप्पा सरवंदे, वासुदेव डोंगरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या आनंदी वातावरणात सर्व मुलांना खाऊ वाटप तशेच सर्व पालकांना अल्पउपहारदेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक मा. डाके गुरुजीयांनी सर्वांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले तशेच सहशिक्षक कुटे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...