🟥जळगावात हृदयद्रावक घटना!
शेतातील विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
जळगाव : एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात आज दुपारी घडलेल्या एका भीषण घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतात मजुरीसाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जणांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. मृतांमध्ये आजी, पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विजेच्या तारांचा फटका बसल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी शेतमालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मृतांची नावे
विकास रामलाल पावरा (३५)
सुमन विकास पावरा (३०)
पवन विकास पावरा (मुलगा)
कंवल विकास पावरा (मुलगा)
वृद्ध महिला (नाव निष्पन्न नाही
तर दुर्गा विकास पावरा (वय दीड वर्षे) ही बालिका मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावली आहे. सर्व मृत मध्यप्रदेशातील रहिवासी असून ते मजुरीसाठी येथे आले होते.
या घटनेनंतर गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
—
🔖हॅशटॅग्स :
#जळगाव #भीषणअपघात #करुणअंत #शेतातीलवीज #मजूरकुटुंब #RatnagiriVartahar
📸 फोटो