🌧️रत्नागिरी–कोल्हापूर महामार्ग बंद!
दोन फूट पाण्यामुळे पोलिसांनी वाहतूक थांबवली; गगनबावडा मार्गे पर्यायी व्यवस्था
कोल्हापूर :
काल (गुरुवार) रात्री कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावर दोन फूट पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण झाला असून पोलिसांनी हा रस्ता तातडीने बंद केला आहे. रात्री २ वाजल्यापासून हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी माईकद्वारे सतत सूचना देत “या रस्त्यावरून प्रवास करू नका, जीव धोक्यात घालू नका” असा इशारा दिला आहे.
सध्या रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी गगनबावडा हा पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.
🔖हॅशटॅग्स :
#रत्नागिरी #कोल्हापूर #महामार्गबंद #मुसळधारपाऊस #वाहतुकीचा_प्रश्न #गगनबावडा
📸 फोटो