परचुरी रोड पांगारी फाटा–सडेवाडी रस्ता खचला; वाहतूक पूर्णतः ठप्प!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

परचुरी रोड पांगारी फाटा–सडेवाडी रस्ता खचला; वाहतूक पूर्णतः ठप्प!

 

ग्रामस्थ व वाहनचालकांचा संताप; तात्काळ दुरुस्तीची मागणी

 

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसत असून परचुरी रोडवरील पांगारी फाटा ते पांगारी सडेवाडी हा महत्त्वाचा रस्ता पूर्णतः खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली असून वाहनचालक व ग्रामस्थ यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांसह शेतकरी, शालेय विद्यार्थी व रुग्णवाहिका यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खचलेल्या रस्त्याची तात्काळ डागडुजी करून हा मार्ग लवकरात लवकर वाहतुकीस खुला करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.

 

#हॅशटॅग्स

 

#गुहागर #रत्नागिरीवार्ता #परचुरीरोड #रस्ताखचला #वाहतूकबंद #मुसळधारपाऊस

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...