विभागीय जलतरण स्पर्धेत चिपळूणच्या खेळाडूंचे यश_ 🎊🎊
बातमी ~ योगेश पेढांबकर प्रतिनिधि चिपळूण
माननीय उमेश दादा सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त रामतीर्थ जलतरण तलाव चिपळूण येथे संपन्न झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत चिपळूणच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली 7 वर्षाखालील मुलींमध्ये 25 व 50 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात ओवी मयुरी संजय कोरडे हिने अनुक्रमे एक रौप्य व एक कांस्य पदक पटकावले.तसेच स्वराली संसारे,साईशा परब, क्रिशा शिर्के यांनी प्रथमच स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. तसेच 9 वर्षाखालील मुलींमध्ये वेदश्री उषा दीपक खोराटे हिने 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात कास्य पदक व 50 व 100 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात 2 कांस्यपदक प्राप्त केले. प्रविण्यप्राप्त खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक स्नेहा रहाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे माननीय उमेशदादा सकपाळ रामतीर्थ जलतरण तलावाचे व्यवस्थापक प्रीतम जाधव राष्ट्रीय प्रशिक्षक विनायक पवार, रत्नागिरी जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या सचिव मनीषा बेडगे, काजल मानस संसारे, प्रियशा प्रसाद शिर्के, प्रसाद परब आदी मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..