आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सार्थक आडशे याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सार्थक आडशे याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

 

रत्नागिरी : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील कु. सार्थक प्रकाश आडशे (इयत्ता ११वी, वाणिज्य-ब) याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघातून सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे.

 

रत्नागिरी डिस्ट्रिक्ट ॲम्याच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे एस.व्ही.जे.सी. ट्रस्टच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे आयोजित १८ वर्षाखालील (मुले) गटातील रत्नागिरी डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये सार्थक आडशेने उल्लेखनीय कामगिरी केली.

 

स्पर्धेत त्याने उंच उडीमध्ये १.५० मीटर उडी मारून प्रथम क्रमांक मिळवला, तर गोळाफेकमध्ये ११.२० मीटर फेक करून द्वितीय क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या जोरावर सार्थकची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या स्पर्धा २ व ३ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे होणार आहेत.

 

या यशाबद्दल प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सार्थकचा विशेष सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील व कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना समन्वयक प्रा. धनंजय दळवी उपस्थित होते.

 

सार्थकला क्रीडा प्रशिक्षक श्री. संजय इंदुलकर व श्री. प्रसाद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत असून, प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. वसंत तावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील सार्थक आडशे याने रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

 

 

🏷️ Hashtags Mix:

 

#रत्नागिरी #देवरुख #Athletics #SportsNews #StateLevel #TrackAndField #RatnagiriAthlete #CollegeSports #MaharashtraSports #उंचउडी #गोळाफेक #StateChampionship #SarthakAdshe #ASPCollege #RatnagiriNews

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...