🚌 सात महिन्यांनंतर पडवेकरांना दिलासा! अखेर एसटी सेवा पुन्हा सुरू
ग्रामस्थांनी मानले आमदार भास्कर जाधव आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुहागर तालुका प्रमुख सचिन वाईत यांचे आभार
गुहागर :
गुहागर तालुक्यातील पडवे ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी म्हणजे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली एसटी सेवा अखेर पुन्हा सुरू झाली आहे. रस्ता खराब असल्याने गुहागर बस डेपोतर्फे पडवे स्टँडपर्यंत बस येत नव्हती आणि ती तवसाळ फाटा येथून वळवली जात होती. यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायत व डेपो प्रशासनाशी संपर्क साधला तरी तो निष्फळ ठरत होता. त्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांमध्ये भावना निर्माण झाली होती. शेवटी ग्रामस्थांनी आमदार भास्कर शेठ जाधव यांची भेट घेऊन समस्या मांडली. आमदारांनी तातडीने निधी खर्च करण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्षात काम करून दाखवले. परिणामी दोन दिवसांपूर्वीच एसटी सेवा पुन्हा एकदा पडवे स्टँडपर्यंत सुरू करण्यात आली.
यासाठी जमीन मालक व ग्रामस्थ महेश गडदे, विनोद गडदे, गजानन गडदे, सुजित सुर्वे, पराग सुर्वे, विलास गडदे, दिलीप सुर्वे, ओंकार सुर्वे यांनी विशेष सहकार्य केले. या कामात लक्ष घालून समस्या सोडविल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार भास्कर शेठ जाधव तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुहागर तालुका प्रमुख सचिन वाईत यांचे आभार मानले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून उत्सव काळात प्रवासाचा त्रास होणार नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
📌आमची ही पण बातमी वाचा 🔗👈
✅ हॅशटॅग्स :
#गुहागर #पडवे #एसटीबससेवा #भास्करजाधव #शिवसेनाUBT #रत्नागिरीवार्ताहर #गणेशोत्सव
📸 फोटो