बिहारमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची माहिती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


💥 बिहारमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची माहिती

गुप्तचर अहवालानंतर बिहार पोलिसांनी जारी केला हाय अलर्ट

पाटणा – जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमार्गे बिहारमध्ये शिरल्याची गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर बिहार पोलिस मुख्यालयाने राज्यभर हाय अलर्ट जारी केला आहे.

L

या तिघांची ओळख हसनैन अली (रावळपिंडी), आदिल हुसेन (उमरकोट) आणि मोहम्मद उस्मान (बहावलपूर) अशी करण्यात आली आहे. ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूत दाखल झाले होते आणि तिसऱ्या आठवड्यात नेपाळ सीमेमार्गे बिहारमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

बिहार पोलिसांनी सीमावर्ती जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, सीतामढी, मधुबनी, पश्चिम चंपारण, अररिया, किशनगंज आणि सुपौल या भागांत दक्षता वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्यांची गुप्तचर यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.

पूर्णियाचे डीआयजी प्रमोद कुमार मंडल यांनी सांगितले की, राज्य पोलिस मुख्यालयाच्या सूचनांनुसार सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दहशतवाद्यांकडून मोठी दहशतवादी कारवाई घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिस मुख्यालयाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयास्पद हालचालीबद्दल तात्काळ पोलिसांना कळवावे.

 

 


🏷️ हॅशटॅग्स :

#BiharAlert #Terrorist #JaishEMohammed #PakistanTerrorist #NepalBorder #HighAlert #BiharPolice #BreakingNews #RatnagiriVartahar


📸 फोटो 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ पत्रकार - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

Leave a Comment

आणखी वाचा...