सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटे ला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेला येत्या 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर विरोधी पक्षांनी ही सरकारला घेरल होत,संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. जनतेमध्ये हि तीव्र संताप होता घटनेनंतर तब्बल 11 दिवसांनी फरार जयदीप आपटेला काल पोलिसांनी पकडलं आहे. यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं. अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संजय राऊत यांचा गौप्यस्फोट -जादीप आपटे ला वाचवण्या साठी ठाणे येथून सूत्र हलली आहेत त्याला जामीन हि मिळवण्यासाठी पूर्ण सहकार्य हे होतोय तिथूनच कोणाच्अया तरी मदतीने लीगल टीम काम करतेय अ सा गंभीर आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे .

Author: Ratnagiri Vartahar
मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र*
Digital Media Creator's