युवा ग्रुप वाडीवठार तर्फे भव्य रक्तदान शिबीर २०२५ व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
युवा ग्रुप वाडीवठार, कशेळी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले समाजसेवेची जनतेशी नाळ कशी जोडावी.
राजापूर – संदीप शेमणकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील पवित्र भूमीत शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी. युवा ग्रुप वाडीवठार (कशेळी) तर्फे गणेशोत्सवा निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात गावातील ग्रामस्थांनी सहभाग दर्शविला. एकुण १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोबतच कशेळी गावातील पाचही प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत एकुण ११५ विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. त्यांचे तीन गटात विभाजन करण्यात आले होते.
प्रथम गट-: पहिली ते दुसरी
कु.तनुष्का महेंद्र निकुंभ
प्रथम क्रमांक
कु.अर्णव दिवाकर सुतार
द्वितीय क्रमांक
कु.शौर्य संदेश शिवगण
तृतीय क्रमांक
कु.आदित्य योगेश मेस्त्री
उत्तेजनार्थ
कु.विधी राजाराम गोठणकर
उत्तेजनार्थ
दुसरा गट-:तिसरी ते चौथी
कु.आराध्य सुशांत भोंडे
प्रथम क्रमांक
कु.दुवी अमर ठुकरुल
द्वितीय क्रमांक
कु.निधी योगेश वाडकर
तृतीय क्रमांक
कु.आराध्या अनिल थारळी
उत्तेजनार्थ
कु.आर्ची संतोष गोठणकर
उत्तेजनार्थ
तिसरा गट-: पाचवी ते सातवी
कु.संस्कृती शाम जाधव
प्रथम क्रमांक
कु.मयुर अजित मोगरकर
द्वितीय क्रमांक
कु.स्वानंदी मंदार जायदे
तृतीय क्रमांक
कु.स्वराज मनोज वाडकर
उत्तेजनार्थ
कु.कैवल्य जितेंद्र पाटील
उत्तेजनार्थ
दोन्ही उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी युवा ग्रुप वाडीवठारचे अध्यक्ष मंदार डुकळे, वाडीवठार वाडीचे अध्यक्ष प्रकाश डुकळे, प्राथमिक शाळांचे केंद्रप्रमुख सुनिल जायदे गुरुजी, यांचे विषेश मार्गदर्शन लाभले. कशेळी गावचे पोलिस पाटील राजनजी आगवेकर,तसेच वाडीवठार वाडीचे इतर ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली. सर्व उपस्थितांचे आभार आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.