विना परवाना फिरणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यावर कारवाई चे निर्देश – सरपंच सौ. नेहा कुवेसकर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर – ( दिनेश कुवेस्कर). तालुक्यातील निवेली, चव्हाणवाडी, करेल, बाकाळे ,जानशी व इतर गावांमध्ये काही अनोळखी फेरीवाले आजूबाजुचे परिसरात  फिरून व्यवसाय करताना दिसत आहेत, यातील बरेचशे  फेरीवाले उत्तर प्रदेश, बिहार, ओडीसा इकडून येऊन धंदा करताना दिसत आहेत पण काही गावांमध्ये चोरांचे प्रमाण खूप वाढले आहे यावर कोणाचाही धाक राहिला नाही भंगारवाले गावामध्ये फिरताना गावामध्ये जाऊन परवानगी न घेता भंगार गाड्या व इतर सामान चोरून घेऊन जाताना दिसत आहेत.

आता परप्रांतीय व्यवसाय करण्यासाठी गावामध्ये जाताना पहिले प्रत्येक गावात ग्रामपंचायत मध्ये आधार कार्ड, मोबाईल याची पूर्ण नोंद करून रीतसर  ग्रामपंचातीकडून कर पावती घेऊनच धंदा करावा नाही तर या सर्व पर प्रांतीय फेरीवाले यांचें वर कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश निवेली सरपंच स्नेहा कुवेस्कर यांनी दिले आहेत.

तरी ग्रामस्थानी असे अनोळखी फेरीवाले जर आपल्या परिसरात व्यवसाय करत असतील आणि त्यांचे कडे पंचायत ची कोणतीही रीतसर परवानगी नसेल तर त्वरित त्यांची तक्रार ग्रामपंचायत पंचायत मध्ये द्यावी.असे ही सरपंच यांनी सूचीत केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ पत्रकार - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

Leave a Comment

आणखी वाचा...