पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ५ ते ८ मार्चदरम्यान ‘महिला कला महोत्सव २०२६’ची भव्य सांस्कृतिक पर्वणी

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ५ ते ८ मार्चदरम्यान ‘महिला कला महोत्सव २०२६’ची भव्य सांस्कृतिक पर्वणी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ५ ते ८ मार्च २०२६ दरम्यान “महिला कला महोत्सव २०२६” या बहुआयामी सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य, नाट्य, संगीत, मुलाखती, छायाचित्र प्रदर्शन तसेच महिला बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यांचा समावेश असलेली ही सांस्कृतिक मेजवानी रसिकांसाठी खुली आहे.
गुरुवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे उद्घाटन ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर सायंकाळी ७ वाजता “उत्तरा” ही नृत्यनाटिका सादर होईल. महाभारतातील अभिमन्यूच्या वीरगतीनंतर उत्तरा हिची मनोवस्था या सादरीकरणातून उलगडली जाणार आहे. संकल्पना व दिग्दर्शन सोनिया परचुरे यांचे आहे. पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांनी काही रचना स्वरबद्ध केल्या आहेत. संगीत प्रणव हरिदास यांचे आहे. लेखन मुग्धा गोडबोले तर काव्य शिवप्रिया सुर्वे यांचे आहे. शरयू नृत्य कलामंदिरच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. त्याच दिवशी रात्री ८ वाजता मृणालिनी नानिवडेकर, संपादक मल्टिमीडिया, पुढारी माध्यम समूह यांची “माध्यमप्रमुख ती” ही मुलाखत मृण्मयी भजक घेणार आहेत.
शुक्रवार, ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता कोलाज क्रिएशन्स, पुणे यांचे “आनंदमठ” हे संगीत नाटक सादर होईल. हे नाटक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित आहे. लेखन विनीता तेलंग यांचे असून दिग्दर्शन रवींद्र सातपुते यांचे आहे. सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची महिला सशक्तीकरणावरील मुलाखत अभिनेत्री संजना पाटील घेणार आहेत. रात्री ७.३० वाजता “वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे” हा नृत्याविष्कार सादर होईल. ८० वर्षांत सुमारे ८ हजार झाडे लावणाऱ्या पद्मश्री सालुमरदा थिम्मक्का यांना या कार्यक्रमातून अभिवादन करण्यात येणार आहे. संकल्पना व नृत्यदिग्दर्शन विदुषी शमा भाटे यांचे आहे.
शनिवार, ७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता “एक तिची गोष्ट” हे नृत्य-संगीत नाटक सादर होईल. फुलवा खामकर आणि अस्मा खामकर यांचा अभिनय यात पाहायला मिळेल. दुपारी ३ वाजता “ती चे सूर” हा कार्यक्रम सादर होईल. सरस्वतीदेवी, आनंदघन, उषा खन्ना, उषा मंगेशकर, आनंदी विकास आणि मीना खडीकर या महिला संगीतकारांच्या गीतांचा समावेश असेल. दुपारी ४ वाजता जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “संगीत अष्टनायिका” हा कार्यक्रम सादर केला जाईल. संकल्पना दीप्ती भोगले यांची असून निवेदन वर्षा जोगळेकर करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता अरुणा ढेरे यांच्या “कृष्णकिनारा” या पुस्तकावर आधारित “मुक्ता” हे मुक्तनाट्य सादर होईल. संकल्पना व नृत्यदिग्दर्शन अर्चना अनुराधा यांचे आहे. संहिता लेखन स्नेहल दामले यांनी केले आहे. संगीतदिग्दर्शन कौशल इनामदार यांचे आहे. रात्री ८ वाजता भूषण कोरगावकर लिखित व दिग्दर्शित “मी कात टाकली” हा खानदानी लावणी कार्यक्रम रंगेल. गौरी जाधव, पुष्पा सातारकर, गीता वाईकर आणि अनिता दाते सहभागी होणार आहेत.
रविवार, ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रा. चेतक घेगडमल लिखित व शिवानी पेडणेकर दिग्दर्शित “धि हिंदू लेडी” हे नाटक सादर होईल. भारतीय पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर रखमाबाई सावे-राऊत यांच्या जीवनसंघर्षावर ते आधारित आहे. दुपारी ३ वाजता विदुषी माधवी नानल यांच्या संकल्पनेतून “शब्दरंग सूरसंग” हा रागदारी कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी ५ वाजता “स्त्री-स्वर-गौरव” हा कार्यक्रम सादर केला जाईल. संकल्पना व दिग्दर्शन अनुजा झोकरकर यांचे आहे. रात्री ८ वाजता “आदिम गीतकथा” हा आदिवासी स्त्रियांच्या भावविश्वावर आधारित कार्यक्रम सादर होईल. सादरीकरण प्राची माया गजानन करणार असून महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने तो आयोजित आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने अकादमीच्या कलांगणात महिलांसाठी ऑन द स्पॉट व्यंगचित्रे आणि फूटमसाज ही विशेष आकर्षणे उपलब्ध असतील. सर्व कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला आहे. या सांस्कृतिक पर्वणीचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन मुंबई (गुरुदत्त...
Read More
महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
Read More
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन

शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव

शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव नवीमुंबई (मंगेश जाधव) पुणे येथील ऐतिहासिक वास्तू लाल महल येथे छत्रपती...
Read More
शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव

विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश. गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक

विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश. गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक ​आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक...
Read More
विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश.  गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक

आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख संदीप...
Read More
आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी अहिल्या नगर - नंदकुमार बागडेपाटील  प्रवरानगर येथील जिल्हा परिषद...
Read More
ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल: जिष्णू देव वर्मा,देशभरात नव्या नियुक्त्या ही जाहीर

देशाच्या राजकीय वर्तुळातून राज्यपालांच्या नियुक्त्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी (५...
Read More
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल: जिष्णू देव वर्मा,देशभरात नव्या नियुक्त्या ही जाहीर

युद्धाच्या भडक्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे ताजे भाव

Gold-Silver Rate Today: युद्धाच्या भडक्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे ताजे भाव मुंबई/पुणे: पश्चिम आखाती देशांमधील तणावपूर्ण वातावरणामुळे...
Read More
युद्धाच्या भडक्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे ताजे भाव

भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम

भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक...
Read More
भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ५ ते ८ मार्चदरम्यान ‘महिला कला महोत्सव २०२६’ची भव्य सांस्कृतिक पर्वणी

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ५ ते ८ मार्चदरम्यान ‘महिला कला महोत्सव २०२६’ची भव्य सांस्कृतिक पर्वणी मुंबई (गुरुदत्त...
Read More
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ५ ते ८ मार्चदरम्यान ‘महिला कला महोत्सव २०२६’ची भव्य सांस्कृतिक पर्वणी
Play sound