राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

अध्याप चौकशी न केल्यामुळे मा.उपविभागीय अधिकारी राजापूर यांनी दिले स्मरणपत्र

समिर शिरवडकर-रत्नागिरी

राजापूर :- तालुक्यातील उत्खननाला ठिकठिकाणी पेव फुटल्याचे दिसून येत आहे,महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग,खाण व खनिज ( विकास व विनियमन) अधिनियम १९५७ च्या आदेशाला तसेच पर्यवरण सरंक्षण अधिनियम १९८६ आणि वन्यजीव अधिनीयम १९७२ आधारीत पर्यावरण संवेदनशील क्षेत्र या अधिनियमाना राजापूर तहसीलदार विकास गमरे आणि त्या आधीच्या तहसीलदार शीतल जाधव यानी केराची टोपली दाखविली आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

तालुक्यातील कोदवली सर्व्ह न.२४/१, क्षेत्र एकूण ३.१२.५८ यात या अनधिकृत उत्खनन झाल्याचे या आधी रत्नागिरी टाइम्स या वृत्तपत्रने दि.१३/६/२४ ला प्रसिद्ध केले होते.या विषयी उत्खनन परवानगी पाहता एका वर्षीतमध्ये मा. तहसीलदार यांनी ५०० ब्रास पेक्षा जास्त उत्खनची परवानगी दिली आहे, याचप्रमाणे सपाटीकरण करण्यासाठी सुद्धा या अधिकाऱयांनी परवानगी मध्ये मुदत दिली नाही त्यामुळे हे बे-मुदत उतखन सुरू आहे होते, आजही उत्खनन सुरू असल्याचे दिसून येत.आजतागायत ETS चा देखील अहवाल नाही.

त्याचप्रमाणे तालुक्यातील साखर सर्व्ह न.१५१/६, क्षेत्र ०.४७.५० मध्ये सपाटीकरणसाठी परवानगी दिली असता, त्यात मुदत दिली होती, परंतु वाढीव सपाटीकरनाला परवानगी दिली असता त्यात मुदत नसल्याने आज ही उतखन सुरू आहे.तसेच सपाटीकरण परवानगी असताना माती वाहुन त्याची विक्री करत असताना पास नसलेने मा. तहसीलदार यानी एक लाख इतका दंड बाजावला असल्याचे समजते. त्याचतच कहर म्हणजे महसूल मंडळ अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी कोंडे तर्फे सौंदळ आणि कुंभवडे यांनी गौण खनिज याची वाहतूक झाली नसल्याची पंचयादी करून वरिष्ठांना सादर केली असून ,स्वतः तहसीलदार यांनी याच प्रकरणी दंड बजावला असल्याचे जणू विसरून गेले असावेत अशी शंका येते.

तसेच राजापूर तालुक्यातील डोंगर -सर्व्ह न.३/अ/३ क्षेत्र -५८००.०० चौ.मी या भूखंडाला अजून रेखांकण परवानगी मिळाली नसताना देखील उत्खनन झाले आहे.त्याचप्रमाणे सर्व्ह न.३/अ/४/अ/१ क्षेत्र ०.०६.०० मध्ये फक्त बिनशेती परवानगी मिळाली असून,माती उतखन बाबत परवानगी नाही, त्याचबरोबर डोंगर गाव हे इको- सेन्सेटिव्ह झोन तालुक्यातील ५१ गावा पैकी एक असून त्यात फक्त घर बांधनी आणि दुरुस्ती साठी म्हणजेच निवासीसाठी परवानगी दिली असताना ,मात्र माती उत्खनन करून तहसीलदार यानी वाहतुक साठी रॉयल्टी सुध्दा भरून घेतली असल्याचे कागदपत्रावरून दिसून येते.या वरून राजापूर तालुक्यात माती उत्खननाला राजापूर तहसीलदार याचे अभयच असल्याचे वारंवार दिसुन येते.सपाटीकरण ला परवानगी मात्र मुदत नाही,वाहतूक झाली असून त्याबाबत दंड सुद्धा आकारला असून मात्र अधिकाऱ्यांचा अहवाल वाहतुक झाली नाही, असे अनेक प्रकार राजापूर महसूल विभागात घडतं आहेत.यावरून राजापूर तहसीलदार यांचे उत्खननाला अभयच असल्याचे दिसून येत.अश्या आशयाची बातमी दैनिक चालु वार्ता ने प्रसिद्ध केली होती,त्या अनुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.जसमीन ( भा. प्र.से.) यांनी सदर विषयी मा. तहसीलदार यांना पत्र काढून संपूर्ण विषयी उत्खननाची घटनास्थळी पाहणी करून ,अनधिकृत माती उत्खननाची ETS मशीन द्वारें मोजणी करून अनधिकृत उत्खननबाबात दंडात्मक कारवाई करून तसा अहवाल या कार्यालयाकडे पाठवावा असे आदेश दिले आहेत,परंतु,या उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्या पत्राला मा. तहसीलदार विकास गमरे यांनी केराची टोपली दाखवली आहे.अद्याप चौकशी अहवाल नाहीच,या उलट डोंगर मंडळ हद्दीत पुन्हा अनधिकृतपणे डोंगर मध्ये माती उत्खनन सुरूच आहे असे निदर्शनास आले आहे,त्याचप्रमाणे साखर मधील अनधिकृत जांभा दगड साठवण आणि एन ए साठी परवानगी घेण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रकरण आले असून त्यावर शेरा देऊन प्रकरण उलट अर्जदार यांच्याकडे दिल्याचेही समजते.

या,सर्व प्रकरणात समंधित मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,काही उपविभागीय अधिकारी मधील कर्मचारी, तसेच मा. तहसीलदार हे कुणाच्या दबावाखाली काम करतात की काय? अशी दाट शंका आहे,आजतागायत या प्रकरणी चौकशी न झाल्यामुळे मा. उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्याकडून स्मरणपत्र क्र.११८३/२०२५ दि.११/०३/२६ रोजी दिले आहे.ह्याला ही केराची टोपली दाखवणार का हे पाहावे लागणार आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय 'ब्लॅक बेल्ट' परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या यशाने लांजाचा नावलौकिक; ७...
Read More
लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

■ राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश ■ अध्याप चौकशी न...
Read More
राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे...
Read More
टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): राजीव गांधी आंतरराष्ट्रीय...
Read More
पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

*पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ *२६वे कविसंमेलन दादरमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) वयाची...
Read More
सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या ९व्या...
Read More
जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका सर्व नियामक नियमांचे काटेकोर पालन आणि अत्याधुनिक 'क्लोज्ड-लूप' प्रणालीचा...
Read More
लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा