कोलकाताच्या आर.जी. कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहें, तरीही कोणताच मार्ग अद्याप सापडत नाही.
कोलकाता -कोलकाताच्या आर.जी. कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप अद्याप सुटलेला नाही.
शनिवारी ममता बॅनर्जी आणि डॉक्टरांमध्ये बोलण्याचा प्रयत्न झाला. मात्र डॉक्टरांनी चर्चेचे थेट प्रक्षेपण करण्याचा आग्रह धरल्याने चर्चा पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे कोलकात्यात त्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे.
शहरातील सॉल्ट लेक परिसरातील आरोग्य भवनासमोर डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे.
दुसरीकडे या प्रकरणी सीबीआयने माजी प्राचार्य आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्यावर कारवाई केली आहे. पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
तळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिजित मंडल यांना अटक करण्यात आली आहे.