लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🔴 लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

: ७६ दिवसांपासून सुरू धरणे आंदोलन; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ नाराज, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

चिपळूण : लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज या कारखान्याविरोधात सोमवारी हजारो ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढत कारखाना तात्काळ बंद करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाने आज उग्र रूप धारण केले.

कारखान्यात तयार होणारे पीफास (PFAS) रसायन पर्यावरण आणि मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी ‘पीफास हटाव, कोकण बचाव’ तसेच ‘लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

या मोर्चात कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग होता. पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाची तीव्रता स्पष्ट झाली.

दरम्यान, या मागणीसाठी गेल्या ७६ दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरू असून, अशोक जाधव आणि राजेंद्र आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला जिल्हाभरातूनच नव्हे तर राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे.

प्रशासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या सूचनेनुसार कारखान्यापासून काही अंतरावरच मोर्चा थांबवण्यात आला.

यावेळी आंदोलनाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन सादर करत कारखाना बंद करण्याची मागणी पुन्हा ठामपणे मांडली. तसेच, लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

> “कंपनीविरोधात सर्व शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाला काही दिवसांची मुदत दिली आहे. त्या कालावधीत कारखाना बंद झाला नाही तर आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल.”

— रवी गोवळकर, ग्रामस्थ, लोटे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर मुंबई विभागात सर्वाधिक...
Read More

मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

मुंबई महानगरपालिकेतील चार वादग्रस्त प्रस्तावांना अचानक मिळालेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  मुंबई महापालिका: 'मातोश्री'वरून मध्यरात्री फोन...
Read More
मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

. अखेर तो क्षण आला! समर देणार स्वानंदीला प्रेमाची जाहीर कबुली; 'वीण दोघांतली ही तुटेना'चा नवा प्रोमो व्हायरल! वरळीचा कट्टा...
Read More
वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे (मिलिंद मिरजकर): साहित्य भारती, ठाणे यांच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते सतीश सोळांकूरकर...
Read More
महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना